in

CISFच्या 40 जवानांची सायकल रॅली साताऱ्यातून पुण्याकडे रवाना

सातारा | प्रशांत जगताप | तंत्र्याचा अमृतमहोत्सव तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने एकतेचा संदेश देत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) यांनी सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीची सुरूवात 29 सप्टेंबर रोजी केरळ मधील त्रिवेंद्रम इथे झाली. सायकलवर प्रवास करत सातारा इथे पोहचलेल्या या रॅलीने ‘चारभिंती’ हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले आहे. 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे स्मारक उभारण्यात आले आहेत.

केरळ, कर्नाटक, गोवा येथून प्रवास करीत आलेल्या या रॅलीला आज जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, CISF कमांडर गिरीधर भार्गव यांनी हिरवा झेंडा दाखवला. या सायकल रॅलीत CISF च्या 40 जवानांचा सहभाग आहे. ही रॅली सातारा पुणे- या मार्गाने पुढे गुजरातमधील केवडियाकडे रवाना होणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिवशी 31 ऑक्टोबर रोजी केवडिया इथे पोहचतील.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

खामगाव- आलेगाव बसला अपघात

किरण गोसावीवर फसवणूकीचा गुन्हा, कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता