in

शरद पवारांची ही योजना की इच्छा ? दिल्ली हिंसाचारावरून भातखळकरांचा सवाल

लोकशाही न्यूज नेटवर्क

आत्तापर्यत दिल्लीतील शांत असलेले शेतकरी जर हिंसक झाले तर सर्व जबाबदारी भाजप सरकारची असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकार दिला. त्यांच्या वक्त्यव्यावर आता भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी “ही योजना आहे की इच्छा? काहीही असली तरी ती पूर्ण होणार नाही एवढे निश्चित…” असे म्हणतं प्रतिउत्तर दिली आहे.

आतापर्यंत शांत असलेले शेतकरी जर हिंसक झाले तर सर्व जबाबदारी भाजप सरकारची असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत असून, प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर ही शेतकरी दिल्लीतील विविध सीमांवर आंदोलन करीत आहे. आता शांत असलेले शेतकरी जर हिंसक झाले तर याला जबाबदार केंद्र सरकार असेल. असे पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

“शेतकऱ्यांना शांततेचा मार्ग सोडल्यास देशात समस्या निर्माण होईल. त्याची जबाबदारी भाजप सरकारची असेल असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. पण ही योजना आहे की इच्छा? काहीही असली तरी ती पूर्ण होणार नाही एवढे निश्चित…” असे उत्तर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी दिले आहे.

शेतकऱ्यांनी आता उद्या (06 फेब्रुवारी) चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. शेतकरी देशातील सर्व राष्ट्रीय आणि राज्यांतर्गत असलेले मार्गांवर चक्काजाम आंदोलन करणार आहेत. दुपारी 12 ते 3 दरम्यान हे आंदोलन चालणार आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी चक्काजामची घोषणा केली असून, सरकारने जर ऑक्टोबर पर्यंत हे कायदे मागे घेतले नाही तर, देशात 40 लाख ट्रॅक्टरांची भव्य रॅली काढू,असा इशारा टिकैत यांनी सरकारला दिला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

न्यायालय म्हणतंय, राज ठाकरे हाजिर हो… मनसैनिक ग्रॅण्ड वेलकमच्या तयारीत!

इंधन दरवाढीवरून शिवसेना आक्रमक; राज्यभर तीव्र आंदोलन