in

Bhandup Hospital Fire | चूक रुग्णालय प्रशासनाचीच; हेमंत नगराळे

भांडुपच्या ड्रीम्स मॉल आगप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्राथमिक चौकशीत रुग्णालय प्रशासनाची चूक दिसत असल्याचे सांगून याच्या सखोल चौकशीनंतर संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशींनी मॉलमधील हॉस्पिटलला परवानगी दिली असल्याची माहिती समोर येत आहे.

भांडुपच्या ड्रीम्स मॉलच्या आगीची घटना समजल्यानंतर भांडूप पोलीस आणि अग्निशमन दल तेथे दाखल झाले. शुक्रवारी सायंकाळपर्यंत येथील परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरू होते. शुक्रवारी सकाळी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील, अपर पोलीस आयुक्त संजय दराडे, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीत रुग्णालयाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. याबाबत सखोल तपास सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे नगराळे यांनी सांगितले. तर, अग्निशमन दलाकडून अहवाल प्राप्त होताच, त्यानुसार संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंद करून दाेषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती भांडूप पोलिसांनी दिली.

तसेच भांडुप येथे लागलेल्या आगीत मॉलमध्ये अनेक सिलेंडरचे बाटले मिळाले आहेत. परिणामी सिलिंडरच्या स्फोटानं आख्खा मॉल उडाला असता. या भांडुप येथील ड्रिम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी पोलीसांकडून चौकशी सुरु आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Pune Fire : पुण्यातील फॅशन स्ट्रीटला आग; 800 दुकानं जळून खाक!

बंगाल, आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात