in

Belagavi Municipal Election 2021 | बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक जाहीर

नंदकिशोर गावडे | गेल्या दोन वर्षांपासून सर्वांची प्रतीक्षा लागलेली बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक अखेर झाली आहे. त्यामुळे लवकरच निवडणूकीचे बिगुल वाजणार असुन राजकीय पक्षाच्या हालचालीना वेग आला आहे.

निवडणूक आयोगाने बेळगावसह हुबळी-धारवाड आणि कलबुर्गी (गुलबर्गा) या तीन महापालिकांच्या निवडणूकींसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. 16 ऑगस्ट रोजी बेळगावचे जिल्हाधिकारी बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात अधिसूचना जारी करतील.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 3 सप्टेंबरला मतदान होणार आहे. सहा सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल.निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट पर्यंत राहणार आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय पक्षाच्या हालचालीना वेग आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ujjwal Nikam । ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना हृदयविकाराचा झटका

शमिता शेट्टीचा बिग बॉस ओटीटीमध्ये खूलासा; वाचा सविस्तर