in

मरण्याआधीच घरच्यांनी खोदला वडीलांचा खड्डा

getty images (संदर्भासाठी)
Share

नागपूरमध्ये दिवसागनिक कोरोना बाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढतो आहे. त्याचगतीने इथला मृत्यूदराचे प्रमाणही वाढत आहे. त्याचा परिणाम मेडिकल यंत्रणेवर पडतोय. तर दुसरीकडे कोरोनाची लागण झालेल्या ज्या व्यक्ती विलगीकरण कक्षामध्ये उपचार घेत आहेत, त्यांचे कुटुंबीय भीतीच्या सावटाखाली जगताना पाहायवला मिळत आहेत.

हे सगळं सुरू असताना हॉस्पिटलमधून घरचा व्यक्ती वारल्याचा फोन आल्यावर घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकते; पण वास्तव मात्र काही वेगळंच असतं. असाच धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आला आहे.

नागपूरच्या ताजबाग परिसरामध्ये राहणाऱ्या नाजिम मुल्ला यांचे वडील आठ दिवसापूर्वी घरच्या बाथरूममध्ये पडले. त्यानंतर त्यांना नागपूरच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यादरम्यान त्यांना पॅरालिसीसचा अटॅकही आला आणि नंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचेही समोर आले. त्यानंतर त्यांच्यावर मेडिकल हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू करण्यात आले, पण त्यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे परिवारातील कोणताही सदस्य त्यांच्याजवळ नव्हता. लगेच दुसऱ्या दिवशी परिवारातील लोकांना पहाटे चार वाजता त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि त्यानंतर खळबळ माजली.

फोन आल्यानंतर परिवारातील सगळ्या लोकांवरती आभाळच कोसळं आणि सगळ्यांनी रडारड सुरू केली. सायंकाळी पाच वाजता हॉस्पिटलमध्ये हे लोकं रुग्णाची डेडबॉडी घ्यायला गेले. डेडबॉडी ही आपल्या वडिलांपेक्षा आकाराने लहान होती, म्हणून त्यांनी डॉक्टरांकडे त्याविषयी चौकशी केली.
नातेवाईकांचा मृत्यू झालेल्या रुग्णांचा चेहरा ही त्यांच्या नातेवाईकांना बघू दिला जात नाही, पण हा मृतदेह आकाराने लहान असल्याने ही घरच्यांच्या लक्षात आली. हा मृतदेह आपल्या व्यक्तीचा नसल्याचा त्यांना ठाम विश्वास बसला, म्हणून त्यांनी मृतदेहाचा चेहरा उघडून दाखवण्याची मागणी केली. तेव्हा सगळा प्रकार उघड झाला.

चौकशी केल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू झाला नसून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे यावेळी लक्षात आले. या सगळ्या प्रकारात मेडिकल प्रशासनाने जिवंत व्यक्तीलाच मृत घोषित केल्याने मेडिकल कॉलेजचा भोंगळ कारभार समोर आला आहे. हा सगळा प्रकार फाईल अदलाबदल झाल्यामुळे घडला आणि असा प्रकार परत घडू नये यासाठी मेडिकल प्रशासनाला तुकाराम मुंढे यांनी निर्देश दिले आहेत.

यावेळी परिवारातील लोकांच्या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. नाहीतर त्यांनी त्यांच्या वडिलांना मृत समजून अंत्यसंस्कार केले असते आणि वडील मात्र हॉस्पिटलमध्ये उपचार घेत राहिले असते.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

39 thousand 287 unemployed got employment in Corona

दूध आंदोलक मुख्यमंत्र्यांना पाठवणार 5 लाख पत्र…

कोकणात येणा-या गणेभक्तांवरती खड्यांचे विघ्न…