शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनामधून करण्यात आलेल्या टीकेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं असून आल्याने घाव वर्मी बसला असल्याचं म्हटलं आहे. संशयास्पद मृत्यूचा धड तपास होऊ न देता आदळआपट करणे हे लोकशाहीचे विकृत रूप आहे. एक ना अनेक प्रश्न राज्याला भेडसावत आहेत त्यावर बोलायचे नाही लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार असं शिवसेनेने म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावल्यानंतर खासदार संजय राऊत यांनीदेखील त्यांना पलटवार उत्तर दिलं आहे.
यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस सामना वाचतात ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे त्यांना जगात काय सुरु आहे, हे कळेल. देवेंद्रजींनी सामना वाचायची सवय लागली असेल तर कौतुक आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्र, देशात सत्य काय घडतंय त्याची माहिती सामनामधून मिळत असते. संपूर्ण जग सामनाची दखल घेतं. त्यामुळे देवेंद्रजींना चांगली सवय लागली असेल तर मी त्यांचं कौतुक करतो” असा पलटवार संजय राऊत यांनी केला आहे.
तर दुसरीकडे राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार तीन महिन्यात पडेल. तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ हे सरकार टिकणं आणि टिकवणं ही कोणत्याही राजकीय पक्षाची घोडचूक आहे, असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. कोशिश करने वालों की हार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती,” असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यावर संजय राऊत यांनी कोणत्याही सिनेमात नायकासोबत तितकाच खंदा खलनायकही लागतो. त्यांच्यामुळेही सिनेमा जोरात चालतो. महाविकासआघाडीच्या सिनेमात देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार त्यांची पात्रं उत्तमपणे वठवत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. जर यांनी आपल्या भूमीचा चांगल्या वठवल्या तर पुढची साडे तीन वर्षे खेळी मेळीचे वातावरण राहील, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.
Comments
Loading…