in ,

खबरदारी घ्या! देशात मागील 24 तासात 6 हजार 566 नवे कोरोना रुग्ण

Share

नवी दिल्ली: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबररदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. कोरोना व्हायरस गुणाकाराची श्रृंखला तुटावी यासाठी मोठे प्रयत्न होत आहेत. देशात मागील 24 तासात 6 हजार 566 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 194 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1 लाख 58 हजार 333 वर पोहचली असून, मृतांची संख्या 4 हजार 531 एवढी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या देशात 86 हजार 110 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 67 हजार 692 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. रुग्ण वाढण्याचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. तर एकूण रुग्णांपैकी मृत्यू होण्याचे प्रमाण एकट्या महाराष्ट्रात 50 टक्के आहे. त्यातच दिलासा देणारी बाब म्हणजे आता च्या घडीला देशात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 42.4 टक्के आहे. मुख्य म्हणजे योग्य ती काळजी, प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास कोरोना पासून किमान दूर राहणे शक्य आहे. याबरोबरच सोशल डिस्टन्सिंग चे पालन केल्यास कोरोनावर आपण वेगाने मात करणं शक्य होईल.

भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात बुधवारी 2 हजार 190 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 105 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 56 हजार 948 वर पोहचली आहे. यापैकी 1 हजार 897 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 17 हजार 918 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Tik Tok चे वाईट दिवस सुरू? भारतीय अ‍ॅप Mitron ची टक्कर, जाणून घ्या..

Manjeshwar Brothers: ऑस्ट्रेलियातील दोन मराठमोळ्या भावंडांचे व्हिडिओ व्हायरल, कोण आहेत हे दोन चिमुकले?