in

पतंजलीच्या कोरोनिलवर महाराष्ट्रात बंदी

Share

कोरोना विषाणूवर औषध काढल्याचा दावा करणाऱ्या पतंजलीला राज्य सरकारने मोठा धक्का दिला आहे. पतंजलीच्या कोरोनिल औषधावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. त्यामुळे कोरोनील वर बंदी घालणार राजस्थान नंतरच महाराष्ट्र हे दुसरं राज्य ठरलं आहे.

कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना नुकतेच पतंजलीने कोरोनावर कोरोनील नामक औषध शोधल्याचा दावा केला होता. या संदर्भातील माहिती पतंजलीकडून पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली होती. मात्र, बाजारात आणण्याआधीच केंद्र सरकारनं या औषधाच्या विक्रीला विरोध केला होता. तसेच औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

हमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून बाबा रामदेव यांनी तयार केलेल्या कोरोनिल या औषधावर बंदी घालण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं आहे. कोरोनिलच्या क्लिनिकल ट्रायल बाबत कोणताही पुरावा नाही. जयपूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या औषधाचं क्लिनिकल ट्रायल करण्यात आलं होतं की नाही, याचा शोध घेणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनिलची विक्री होणार नाही, असं सांगतानाच महाराष्ट्र सरकार राज्यात नकली औषधांच्या विक्रीला कदापीही परवानगी देणार नाही, हा आम्ही बाबा रामदेव यांना इशारा देत आहोत, असं देशमुख यांनी म्हटलं आहे.

आयुष मंत्रालयाने अद्याप औषध मंजूर केले नसल्यामुळे पतंजलीविरोधी कोरोना औषधीची जाहिरात किंवा विक्री करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र सरकार पतंजलीविरूद्ध कायदेशीर कारवाई करेल असा इशाराच अनिल देशमुख यांनी दिला आहे.

लायसन्समध्ये कोरोनाचा उल्लेखच नाही…
पतंजलीच्या लायसन्सच्या अर्जात कुठेही कोरोना व्हायरसचा उल्लेख केलेला नव्हता. विभागानं केवळ रोग प्रतिकारक शक्ती, खोकला व ताप यावर औषध बनवण्याचीच परवानगी दिली होती. करोनावर औषध तयार करण्याची परवानगी कशी मिळाली, याबद्दल पतंजलीला नोटीस पाठवून उत्तर मागणार आहे,” असं परवाना अधिकाऱ्यांनं सांगितलं.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

बापरे…मृतदेह नेला टॅक्सीच्या टपावरून