in ,

अकोलासाठी 185 कोटींच्या निधीवरून बच्चू कडूंची नाराजी

लोकशाही न्यूज नेटवर्क

अमरावती विभागाच्या वार्षिक नियोजनाची बैठक सोमवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन अमरावती जिल्ह्यायासाठी ३०० कोटीची तरतूद करण्यात आली. त्याचप्रमाणे यवतमाळ ३२५ कोटी, बुलढाणा २९५, वाशिम १८५ तर अकोलासाठी १८५ कोटीचा निधी देण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकोल्यासाठी थोडा निधी वाढवून दिल्यामुळे अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली.

“मी सरकारमध्ये आहे त्यामुळे बोलू शकत नाही. विदर्भाचा अनुशेष भरून निघावा याकरिता आपण अधिक निधीची मागणी केली होती, मात्र निधी वाढून देण्यात आला नाही, पण निधी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू,” असे बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं.

विभागातील पाचही जिल्ह्यांना तरतुदीपेक्षा वाढीव निधी देण्यात आल्याचे अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अकोला जिल्ह्यासाठी १६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, ती १८५ कोटी रुपये करण्यात आली आहे, याशिवाय अमरावतीची तरतूद २८५ वरून ३०० कोटी, यवतमाळसाठी ३१० वरून ३२५, बुलढाणा जिल्ह्यासाठी २८५ वरून २९५ तर वाशिम जिल्ह्यासाठी तरतूद १४० कोटी रुपयांवरून १८५ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

वाशिम जिल्हा हा आकांक्षित (मागास) जिल्ह्यात मोडत असल्याने वाढीव निधी देण्यात आल्याचे अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्यांनी मात्र निधीच्या वाटपाबाबत कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचे संकेत दिले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

क्रीडा कोट्यातून मिळणाऱ्या सरकारी नोकरीच्या यादीत २१ नव्या खेळांचा समावेश

किरीट सोमैया मुख्यमंत्र्याविरोधात आयकर विभागात; चौकशीची मागणी