in

“मुख्यमंत्री पदाचं स्वप्न नेत्यांनी नाही जनतेनं पहावं लागतं…”

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात चार उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री करावा, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. वर्ध्याच्या विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री पदावर दावा केल्याची चर्चा राजकीय गोटात आहे. यावर प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री पद अपक्षाला पण दिलं पाहिजे, अशी मागणी केलीय. सगळे पाठिंबा देणारे पक्ष जर उपमुख्यमंत्रीपद मागत असतील तर अपक्षाला का देऊ नये, असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलाय. सोबतच अपक्षाला ही उपमुख्यमंत्री पद देऊन एक मुख्यमंत्री आणि चार उपमुख्यमंत्री असं समीकरण करावं, असे कडू म्हणाले.

राज्यात अनेकांचा डोळा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावर आहे. त्यामुळे अनेकांना मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडायला लागले. याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाची भूमिका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मांडली. मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न नेत्यांना नाही, जनतेला पडावं लागतं, असे कडू म्हणाले. यामुळे त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचे दिसते. सगळेच पाठिंबा देणारे पक्ष उपमुख्यमंत्री पद मागत असल्यास विरोधीपक्षनेत्यालाही उपमुख्यमंत्री करण्याचा सल्ला बच्चू कडू यांनी दिला आहे.

उपमुख्यमंत्री पद अपक्षाला का देऊ नये, तीन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री म्हणजे ते चार चारजण होतात, अशी कोपरखळी कडू यांनी मारली.

देवेंद्र फडणवीस यांनी शिडीशिवाय फासा पलटणार असा इशारा महाआघाडीला दिला आहे. त्यावर बच्चू कडू यांनी “असे बोलल्याशिवाय त्यांना जमणार नाही. त्यांच्याकडील आमदारांची इकडे रांग लागली आहे. इकडे येण्यासाठी ती रांग आहे, त्यांना अवरून ठेवायचं आहे”, असे त्यांनी म्हटले.

आपलं सरकार येतं त्यामुळे त्यांना हे बोलत राहावं लागतं, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य आमच्यासाठी नाही तर त्यांच्याच आमदारांसाठी आहे, असे सांगून कडू यांनी चेंडू पुन्हा भाजपाच्या कोर्टात पाठवला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

एकेरीत उल्लेख करणाऱ्या उद्धव ठाकरेंचे नारायण राणेंनी मानले आभार!

बीडमध्ये अंधश्रद्धेची परिसीमा : करणी केल्याच्या संशयातून चिमुकल्याची हत्या