in

”औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करणारच”, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करणार असल्याचे विधान केले आहे. त्यामुळे सतत निवडणूकीपूर्ती नामांतराचा मुद्दा हाती घेत असल्याच्या विरोधकांच्या आरोपांना हा इशारा दिला. दरम्यान या निमित्ताने पुन्हा एकदा औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. मनसेने सुद्धा बॅनरबाजी तसेच बस स्थानकांची प्लेट बदलून नामांतरावर आक्रमक पावित्रा घेतला होता. दरम्यान मंत्रीमंडळातील अनेक योजनांची सीएमओ कार्यालयावर माहिती देताना औरंगाबादचे संभाजीनगर असाही उल्लेख केला होता. त्यावरून सुद्धा मोठा गदारोळ माजवला होता.

औरंगाबादचे नाव बदलण्याचा विषय आमच्याकडे चर्चेसाठी आलेला नाही. ज्यावेळी हा विषय चर्चेला येईल त्यावर काँग्रेस भूमिका मांडेल परंतु नाव बदलण्यास काँग्रेस पक्षाचा ठाम विरोध असल्याची भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली होती. दरम्यान नामांतरासाठी शिवसेनेकडून हालचाली होत असताना महाविकास आघाडीतल मित्र पक्षानं घेतलेल्या या भूमिकेमुळं महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी झाल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘नरेंद्र मोदी स्टेडियम’च्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची जोरदार बॅटिंग

मुख्यमंत्र्यांच्या ‘एकेरी’ उल्लेखावरून देवेंद्र फडणवीसांची दिलगिरी