औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा प्रदुर्भाव वाढत चालला आहे. या वाढत्या रुग्णसंख्येचा शालेय विद्यार्थ्यांना होणारा धोका लक्षात घेता, आता जिल्ह्यातील शाळा 20 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांनी दिले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र पुन्हा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्हयाच्या ग्रामीण भागातील इयता.10 वी व इयत्ता.12 वीचे वर्ग वगळून 20 मार्चपर्यंत सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा बंद करण्याचे आदेश डॉ.अनंत गव्हाणे यांनी दिले.
दरम्यान पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग पुर्वीप्रमाणे ऑनलाईन व दुरस्थ पध्दतीने सुरु ठेवण्यात येत आहे. तसेच इ.10 वी व इ.12 वी चे वर्ग नियमित सुरु ठेऊन सदरील विद्यार्थ्याची दररोज थर्मल गन व ऑक्सिमीटर द्वारे तपासणी करुन त्याची विद्यार्थीनिहाय नोंद ठेवण्यात यावी असे निर्देश आहेत.
Comments
Loading…