in

नवाब मलिकांविरोधात भातखळकरांची पोलिसांत तक्रार

रेमडेसिवीर इंजेक्शनवरून केंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या व खोटी माहिती देऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती.

नवाब मलिक यांनी केंद्र सरकारने रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांनी महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन देऊ नये, अन्यथा आपला परवाना रद्द करू अशी धमकी दिली असल्याची खोटी माहिती दिली. या माहितीद्वारे प्रसारमाध्यम व समाज माध्यमातून अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचे कामही मलिक यांनी केले. यामुळे भयभीत होऊन हजारो लोक महाराष्ट्र सोडून जाण्यास सुरुवात झाली आहे. रेल्वे स्टेशन, बस स्थानक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यातून मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव झाल्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांचे हे कृत्य पूर्णपणे बेकायदेशीर असून महामारी रोग अधिनियम, 1897 नुसार गुन्हा असल्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भातखळकर यांनी तक्रारीत केली आहे.

दरम्यान राज्य सरकारने पुढील 48 तासांत मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल न केल्यास याप्रकरणी उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. माझ्या एका तक्रारीने कोर्टात केस उभी राहिली होती. त्यामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद सोडावं लागलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

job opportunities | ‘या’ चार मोठ्या कंपन्या देणार 1 लाख नोकऱ्या

Sanjay Raut | खासदार संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण गुलदस्त्यात