in

हिरो नंबर वन ‘झी मराठी २०२१’ च्या मंचावर

बॉलीवुडचा हिरो नंबर वन अभिनेता गोविंदा. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्या अभिनेत्यावर रसिक आजही प्रेम करतात अशा मोजक्या अभिनेत्यांमध्ये गोविंदाचं नाव आवर्जून घेतले जातं. आपल्या अभिनयासह स्टाईल, डान्स, कॉमेडी आणि रोमान्सने गोविंदाने रुपेरी पडद्यावर धम्माल उडवली. 80 आणि 90च्या दशकात तर गोविंदाचे राज्य होता. त्यामुळेच त्याला हिंदी चित्रपटसृष्टीतील नंबर वन असे रसिकांनी नाव दिले . त्याच्या या अभिनयाच्या जोरावर त्याला विविध पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं आहे. गोविंदाने झी मराठी अवॉर्ड्स २०२१ या सोहळ्यात उपस्थिती लावली होती. गोविंदाच्या हजेरीने या सोहळ्याला चारचाँद लागले होते.

गोविंदाने मंचावर मन उडु उडु झालं या मालिकेच्या शीर्षक गीतावर ताल धरला आणि स्वतःच्या स्टाईलमध्ये परफॉर्म करून सगळ्यांना नाचायला भाग पाडलं. आता गोविंदा मंचावर आल्यावर त्याच्यासोबत डान्स करण्याचा मोह कलाकारांना देखील आवरला नाही.या मंचावर झी मराठीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्री म्हणजेच मन झालं बाजींद मधली कृष्णा, मन उडु उडु झालं मधील दिपू, येऊ कशी तशी मी नांदायला मधील स्वीटू, माझी तुझी रेशीमगाठ मधील नेहा आणि तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मधील अदिती या सगळ्याजणी गोविंदासोबत थिरकण्यासाठी सज्ज झाल्या. इतकंच नव्हे तर सगळ्यांची लाडकी परी देखील गोविंदासोबत थिरकण्याचा मोह आवरू शकली नाही.

गोविंदा रिल लाइफमध्ये जसा आहे किंबहुना त्याहून अधिक चांगला माणूस तो रिअल लाइफमध्येही आहे. त्यामुळे इतक्या वर्षांनंतरही गोविंदाचं रसिकांच्या मनातील अढळ स्थान कायम आहे. तसेच हिंदी रसिकच नाहीतर मराठी रसिकही त्याच्या तितकेच प्रेम करतात. इतकंच नाही तर वेळोवेळी त्याचा मराठी बाणाही पाहायला मिळतो.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वर्ध्यात रुग्णालय परिसरात बिबट्याने माजवली खळबळ

धर्मांतर केलं नाही, पण सासू मुस्लिम होती; क्रांती रेडकरचं धर्मांतराच्या आरोपावर उत्तर