in

न्यायमूर्ती थेट राजकीय पक्षांचे शिलेदारच बनलेत; ‘सामना’तून हल्लाबोल

लोकशाही न्यूज नेटवर्क

न्यायमूर्तींनी निवृत्तीनंतरही पदाची आणि न्यायालयाची प्रतिष्ठा ठेवणं गरजेचं असतं. पण अनेक न्यायमूर्ती थेट राजकीय पक्षांचे शिलेदारच बनले आहेत. याचा अर्थ ते पदावर असताना त्या राजकीय पक्षांचे एजंट म्हणूनच काम करत होते. संविधानाच्या रक्षणाचं काम आपली न्यायव्यवस्था करीत असल्याचे पंतप्रधान मोदी सांगतात यावर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तून केला आहे.

गुजरात उच्च न्यायालयाच्या हिरक महोत्सवी कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि न्या. शहा यांनी एकमेकांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. कारण, न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे केव्हाच जाऊन पोहोचले आहे. देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे याविषयी कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही. सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्यायमूर्ती निवृत्तीनंतर गाडी, घोडा, बंगल्याची सोय व्हावी म्हणून आधीपासूनच खुंटा बळकट करत असतात आणि त्यापैकी अनेकांना त्याचं फळ मिळतं. गेलाबाजार एखाद्या राज्याचं राज्यपालपद तर कुठंच गेलं नाही. माजी मुख्य न्यायाधीश श्री. रंजन गोगोई सध्या सरकारी कृपेने राज्यसभेचे सदस्य आहेत. आपली सर्वोच्च संस्था खरंच स्वायत्त आहे का, असे अनेक सवाल सामनातून विचारण्यात आले आहेत.

काय आहे प्रकरण?

शनिवारी (६ फेब्रुवारी) गुजरात उच्च न्यायालयाचा हिरक महोत्सव सोहळा होता. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.आर.शहा यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. मोदी हे आपले सर्वाधिक लोकप्रिय, दुरदर्शी नेते आहेत, असे शहा यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते न्यायमूर्ती शाह?

देशाचे सर्वाधिक लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुजरात उच्च न्यायालयाचा हिरक महोत्सव सोहळा होतोय व त्यात मला सहभागी व्हायला मिळाले यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली समजतो, असे प्रतिपादन न्यायमूर्ती शहा यांनी यावेळी केले. गुजरात उच्च न्यायालय ही माझी कर्मभूमी असल्याचे नमूद केले. त्यांनी या उच्च न्यायालयात जवळपास 22 वर्षे वकील म्हणून प्रॅक्टीस केली तर 14 वर्षे न्यायदान केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अंधेरीच्या एमआयडीसीत कंपनीला भीषण आग

नागपुरात आजपासून शाळेची घंटा वाजणार