in

‘वर्षभरात राजीनामा देण्यासाठी विधानसभा अध्यक्षपद दिलं नव्हतं’

लोकशाही न्यूज नेटवर्क

काँग्रेसला अध्यक्षपद ५ वर्षांसाठी दिलं होतं. केवळ एका वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून काँग्रेसला टोला लगावण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या नव्या भूमिकेत दिसून येतील. यामुळे विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त झाले आहे. यावरूनच शिवसेनेने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

नाना पटोले यांचं अभिनंदन करत शिवसेनेने काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने त्यांचा पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचाच अधिकार, पण सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही, यासाठी सावधान राहावं लागेल, असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वावर अग्रलेखात स्तुतीसुमनं उधळली आहेत. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसेने उत्तम कामगिरी केली. पक्षाच्या अत्यंत पडत्या काळात थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारलं आणि पक्ष मजबुतीसाठी काम केलं. त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवून दाखवलं, असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सुशांतचा ‘पवित्र रिश्ता’ अंकिता करणार पूर्ण

जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचं कौतुक; ‘हे’ आहे कारण