in

वाझे यांच्या भिवंडीच्या गोडाऊनमध्ये ‘एटीएस’… झाडाझडतीला सुरुवात

सचिन वाझे यांच्या विविध मालमत्तांची चौकशी सुरू आहे. एटीएस आणि एनआयए या दोन्ही तपास यंत्रणा सध्या मनसुख हिरेन यांचा मृत्यू तसेच अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांसंदर्भात तपास करत आहेत. याच पार्श्वभूमीवर वाझे यांच्या भिवंडी स्थित गोडाऊनची झाडाझडती करण्यात आली आहे.

आज दुपारी वाझेंच्या ठाण्यातील माजीवडा भागात असणाऱ्या मोटो सर्जन नावाच्या दुकानाची चौकशी झाली होती. या ठिकाणी वाझे यांचे एक ऑफिस होते. सेवेतून कमी केल्यानंतर त्यांनी व्यापार सुरू केला होता. तसेच काही उद्योगधंद्यांमध्येही त्यांची गुंतवणूक असल्याचे उघडकीस आले.

वाझे काही दिवस ट्रायडेंटमध्ये वास्तव्यात असल्यामुळे आज राष्ट्रीय तपास यंत्रणा या ठिकाणी पोहोचली. मुंबईच्या नरिमन पॉईंट वरील ट्रायडेंट या पंचतारांकीत हॉटेलममध्ये सचिन वाझे यांचे काही दिवस वास्तव्य होते. यामुळे एनआयएचे एक पथक या ठिकाणी दाखल झाले

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनाचा स्फोट; राज्यात आज 24 हजार 645 नवीन रुग्ण

…अन लोकसभेत सुप्रिया सुळे आल्या उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावून !