in

एटीएसची पत्रकार परिषद… हिरेनच्या हत्येत पॅरोलवरील गुन्हेगारांचा सहभाग

एटीएसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा खुलासा झाला आहे. मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी सचिन वाझे यांचा मृत्यूमागे हात असल्याचा संशय व्यक्त केला होता. यानंतर एटीएसने तपास हाती घेत या प्रकरणातील महत्वाचे खुलासे केले आहेत. हिरेन यांच्या हत्येत वापरण्यात आलेल्या सीमकार्ड प्रकरणात विनायक शिंदे याला ताब्यात घेण्यात आले आहे. हा आरोपी लखन भैय्याच्या खुनात आजीवन कारावासात होता. कोवीड काळात बाहेर आल्यानंतर त्याचे या प्रकरणाशी धागेदोरे सापडले आहेत. या हत्येत लखनचा थेट सहभाग असल्याचा दावा एटीएसने केलाय.

चौकशी दरम्यान वाझे यांना सर्व आरोप फेटाळले आहेत. मात्र त्यांनी केलेले दावे हे खोटे असल्याचे तपासात उघड झाल्याचे एटीएसने सांगितले.

हिरेन मनसुख यांचा मृत्यू झाल्यानंतर यामध्ये १४ सीमकार्ड वापरल्याचे समोर आले. हे सीमकार्ड्स मुंबईतील पत्त्यांच्या क्लब आणि बेटींगच्या माणसाकडून प्राप्त करण्यात आल्याचे एटीएसने सांगितले. गुजरातच्या एका कंपनीच्या नावावर असल्याचे सिद्ध होते, असे अधिकारी म्हणाले. नरेश रमणीकलाल या व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे.

वाझेंचं काय?

सचिन वाझे एनआयएच्या ताब्यात असल्याने त्यांची चौकशी करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे एटीएसने सांगितले. तसेच या प्रकरणात आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे. तसेच आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता एटीएसने वर्तवली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सरकार अस्थिर करण्यासाठी फडणवीसांचे बेछूट आरोप – कॉंग्रेस

महाराष्ट्रातील गृहमंत्र्यांवर केंद्रीय मंत्र्यांचा हल्लाबोल