मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एटीएसला मोठं यश मिळालं आहे. एटीएस पथकाने आता दमणमध्ये कारवाई करून व्होल्वो कार जप्त केली आहे. तत्पूर्वी, वाझे प्रकरणात पाच कार जप्त करण्यात आल्या होत्या. ही जप्त केलेली सहावी कार आहे. मनसुख यांच्या हत्येसाठी या कारचा वापर झाल्याचा संशय आहे. त्या दिशेने तपास सुरू आहे.
मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन माहिती उघड होत आहे. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला असला तरी, महाराष्ट्र एटीएसकडूनही तपास सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून एटीएसने दमणमध्ये कारवाई करून या प्रकरणाशी संबंधित व्होल्वो कार जप्त केली आहे. मनसुख यांच्या हत्येसाठी या कारचा वापर करण्यात आल्याचा संशय पथकाला आहे. जप्त करण्यात आलेली व्होल्वो कार एटीएसच्या ठाणे येथील कार्यालयात ठेवण्यात आली आहे. वाझे प्रकरणात जप्त केलेली ही सहावी कार आहे. याआधी या प्रकरणाशी संबंधित स्कॉर्पिओ, इनोव्हा, दोन मर्सिडीज, प्रॅडो या कार जप्त केल्या आहेत.
Comments
Loading…