in ,

स्वतःवर गोळी झाडून सहाय्यक पोलीस निरीक्षकाने केली आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क

एपीएमसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. रविवारी म्हणजेच आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

पोलिस ठाण्यात आल्यानंतर ते स्वतःच्या केबिनमध्ये जाऊन बसले. त्यानंतर काही वेळाने गोळी झाडल्याचा आवाज आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली असता हा प्रकार उघड झाला .दरम्यान पवार हे मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. यामुळे ते सतत शांत रहायचे. यामुळे अनेकांनी त्यांच्याकडे तणावाच्या करणाबाबत चौकशी देखील केली होती. परंतु त्यांनी स्वतःच्या तणावाबाबत कोणाकडे वाच्यता केली नव्हती. मात्र ते आर्थिक परिस्थिती व कौटुंबिक कारणाने त्रस्त होते असेही काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उस्मानाबाद चिंचपूर ग्रामपंचायतीचा आदर्श पॅटर्न

पुलवामा… एक भ्याड हल्ला