in

शिवसेनेचं डोकं ठिकाणावर आहे का ? आशिष शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

लोकशाही न्यूज नेटवर्क

शरजील इस्मानीच्या हिंदूविरोधी वक्तव्यावरुन भाजपा आक्रमक झाली असून शिवसेनेचं डोकं ठिकाणावर आहे का? असा सवाल आशिष शेलारांनी शिवसेनेला केला आहे. हिंदूंना सडलेल्या व्यक्ती म्हणणाऱ्या शरजीलला आधी पळून का जाऊ दिलं? खाली डोकं वर पाय अशा प्रकारची अवस्था शिवसेनेची झाली आहे असे म्हणतं आशिष शेलारांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

शरजीलने केलेल्या अपमानास्पद टिप्पणीची तुलना इतर कोणाशी करणं याचा अर्थ शिवसेनेचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न विचारण्यासारखा आहे. शरजीला अटक कधी होणार ?एल्गार परिषदेला परवानगीच का दिली? हिंदूंना सडलेल्या व्यक्ती म्हणणाऱ्या शरजीलला आधी पळून का जाऊ दिलं? असे प्रश्न विचारत आशिष शेलारांनी सेनेवर टीकास्त्र सोडले आहे.

आशिष शेलारांनी मुंबई महानगर पालिकेच्या बजेटच्या मुद्द्यावरून सुद्धा शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. शिवसेनेचं डोकं ठिकाणावर आहे का ? असा सवाल करत महानगरपालिकेच्या बजेटमधून केवळ बनवाबनवी केली जात आहे. बजेट आहे की युवानेत्याचा बालहट्ट असे म्हणत शेलारांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. देशावर टीका झाली की राऊतांना आनंद होते असे देखील ते यावेळी म्हणाले .

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इंटरनेट हा शेतकऱ्यांचा मूलभूत अधिकार; अमेरिकेने दिला सर्वोच्च न्यायालयाचा दाखला

सुप्रिया सुळेंना गाझीपूर बॉर्डरवर रोखलं