in

Ashadhi Ekadashi 2020: आषाढी एकादशी निमित्त जाणून घेऊयात व्रत, शुभ मुहूर्त ?

Share

महाराष्ट्र कोरोनाच्या सावटाखाली असल्याने यंदा पायी वारी रद्द करून घरच्या घरीच हरिपाठ, नामस्मरण, भजन, कीर्तन करून हा सोहळा साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा आषाढी एकादशी व्रत सोबतच चातुर्मासाची सुरुवात आणि सांगता कधी होणार? आषाढी एकादशीचा उपवास ? यासंबंधित माहिती जाणून घेऊयात.

यंदा आषाढी एकादशी 1 जुलैला साजरी केली जाणार आहे. या दिवशी आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला दक्षिणायन सुरू होते. आषाढी एकादशीला `देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी’, असे म्हणतात. यानंतर चार महिने, म्हणजेच आषाढाचे 20 दिवस, श्रावण-भाद्रपद-आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस देव झोपी जातात. वारकरी मंडळींसाठी आषाढी एकादशी पासूनच पुढील चार महिने चातुर्मास काळ सुरू होतो. या काळात महाराष्ट्रातील अनेक घराघरात मांसाहारासोबतच कांदा-लसूण देखील आहारात व्यर्ज केले जाते.

व्रत तारीख आणि वेळ

तारीख : 1 जुलै 2020
तिथी आरंभ : 07:49 PM (30 जूनच्या रात्री)
तिथी समाप्ती : 05:29 PM (1 जुलैच्या संध्याकाळी)
द्रिक पंचांगच्या माहितीनुसार, तर 2 जुलै दिवशी पारायणाची वेळ सकाळी 6 वाजून 4 मिनिटांपासून 8 वाजून 44 मिनिटांपर्यंत आहे.

चातुर्मास ?

आषाढी एकादशी पासूनच चातुर्मासाला सुरूवात होते. यंदा चातुर्मास 1 जुलै पासून सुरू होणार आहे तर त्याची सांगता 26 नोव्हेंबर दिवशी देवउठनी एकादशी दिवशी होणार आहे. हा चातुर्मास बौद्ध आणि जैन बांधवांसाठीदेखील महत्त्वाचा मानला जातो.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

‘BollywoodKiHomeDelivery’ म्हणत अक्षय कुमार, आलिया भट्ट, अजय देवगणसह अनेक मोठ्या बॉलिवूड सिनेमांबाबत हॉटस्टारचा मोठा खुलासा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं विठुरायाला साकडं….