in

Monsoon Update; मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर 10-11 ऑगस्टपासून मान्सून सक्रिय होणार

Share

संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबईत पाऊस ब-यापैकी सक्रिय झाला आहे. मुंबईत दडी मारून बसलेल्या पावसाने मागील 4-5 दिवस अक्षरश: धुमाकूळ घातला. या पावसामुळे मुंबईत अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने आर्थिक नुकसान झाले तर नैसर्गिक हानी देखील झाली. या पावसाने काल रात्रीपासून थोडी विश्रांती घेतली असली तरीही येत्या 10-11 ऑगस्टपासून मुंबईसह पश्चिम किना-यावर मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच त्यानंतर साधारण आठवडाभर ही स्थिती कायम राहणार असल्याचे मुंबई हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.

मुंबई व कोकणावर पावसाचे ढग पाहायला मिळत असून पुढील 48 तासात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

थोडक्यात पावसाचा जोर जरी काही वेळासाठी थंडावला असला तरीही 10-11 ऑगस्ट दरम्यान पुन्हा सक्रिय होणार असल्याचे हवामाना विभागाकडून सांगण्य्त येत आहे.दरम्यान ऑगस्ट च्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे मुंबईकरांवरचे पाणी कपातीचे संकट टळण्याचा अंदाज आहे, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी आणि वैतरणा या तलावक्षेत्रात उत्तम पाऊस झाला असुन मुंबईला पाणी पुरवठा करणारे विहार आणि तुळशी ही मुख्य धरणे भरुन वाहु लागली आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

राशीभविष्य रविवार 09 ऑगस्ट ते शनिवार 15 ऑगस्ट 2020

आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील हॉटेलला आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू