लोकशाही न्यूज नेटवर्क
कुख्यात डॉन अरुण गवळी याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या तो नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याच्यासह पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच वेळी पाच जणांना कोरोना झाल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. सध्या या सर्वांना कारागृहातील विलगणीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
जेल प्रशासनाच्या माहितीनुसार, अरुण गवळीला गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण दिसत होती. यानंतर त्याची चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. डॅडींसोबत इतर चार कैद्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काही दिवस आधीच अरुण गवळी पॅरोलची रजा पूर्ण करुन नागपूर कारागृहात परतला होता. अरुण गवळी हा यापूर्वी 8 वेळा कारागृहातून बाहेर आला आहे. अरुण गवळी याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर जेलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे.
Comments
Loading…