in ,

मध्यप्रदेशातून अवैध गोवंशाची तस्करी करणाऱ्यांना अटक: आर्णी पोलीसांची सापळा रचून कारवाई

संजय राठोड | यवतमाळ : मध्यप्रदेशच्या छत्तेपूर येथून यवतमाळ मार्गे हैदराबाद येथे गोवंशांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा १४ चाकी ट्रक नागपूर तुळजापूर महामार्गावरील आर्णी बायपासवर पकडण्यात आला.

ही कारवाई आर्णी पोलिसांनी केली. ट्रक चालक मुन्ना खान प्यारेलाल खान, राजा ऊर्फ मुबारक सादिक कुरेशी, मोहम्मद जुबेद मोहम्मद मुश्ताक तिघेही रा. औरय्या, उत्तर प्रदेश यांना अटक केली. दरम्यान ही कारवाई आर्णी पोलिस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव यांच्या नेतृत्वात अमित झेंडेकर, मनोज चव्हाण, सतीश चौदर, दिनेश जाधव, मिथून जाधव, सचिन पिसे यांनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सिंधी समाजाच्या सभागृहासाठी भरीव निधी देणार; रोहयो मंत्री संदिपान भुमरे

निझर ते नंदुरबार रस्त्यावर कापूस घेऊन जाणारा ट्रक पलटी