in

अर्णब गोस्वामी व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरण आज संसदेत गाजणार

लोकशाही न्यूज नेटवर्क

अर्णब गोस्वामी व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरण आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आही की, प्रियंका चतुर्वेदी यांनी लीक झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या मुद्द्यावरुन हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असून यावरुन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.

या विषयासंदर्भात संसदेमध्ये चर्चा करण्याची मागणी करणारा प्रस्ताव सोमवारी सकाळी संसदेमध्ये सादर आणि अर्णब यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट हे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे असल्याचा दावा चतुर्वेदी यांनी केला आहे. यासोबतच संसदेमध्ये चर्चा व्हावी अशी मागणी करत सस्पेन्शन ऑफ बिझनेस नोटीस देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

नेमके प्रकरण काय आहे?
रिपब्लिक वाहिन्यांचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संवाद सर्वांनसमोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या संवादांत सर्व मंत्री आपल्याबरोबर आहेत, अशा शब्दांत गोस्वामी यांनी पार्थ यांना दिलासा दिल्याचे उघड झाले आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे अतिरेक्यांनी घडविलेल्या आत्मघातकी हल्ल्याबाबत अर्णब यांचे आक्षेपार्ह विधान आढळते. या हल्ल्यात ४० केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शहीद झाले होते. या व्हॉट्सअ‍ॅप संवादात पुलवामा हल्ल्याबाबत अर्णब यांनी केलेल्या विधानाचा समाचारसमाजमाध्यमांवरून घेतला आहे. यासोबतच समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या संवादांत सर्व मंत्री आपल्याबरोबर आहेत, अशा शब्दांत गोस्वामी यांनी पार्थ यांना दिलासा दिल्याचे उघड झाले आहे. दोघांमधील संवादामध्ये मंत्र्याबद्दलही आक्षेपार्ह विधान करण्यात आलेली आहेत.

मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघडकीस आणला असून त्यामध्ये रिपब्लिक चॅनलची चौकशी चालू आहे. त्याचबरोबर बार्क चे पूर्व प्रमुख पार्थो दास गुप्ता यांना अटकही करण्यात आलेली आहे. चॅट्स मधून रिपब्लिक चॅनेलचे प्रमुख आपली पंतप्रधान कार्यालय, माहिती आणि जनसंपर्क मंत्रालय आणि एएस नवाच्या व्यक्तीशी जवळीक असल्याचे सांगत असल्याचे दिसून येते असल्याचे सांगत आहे,

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘सूर्या सिंघम’ सुपरस्टार सूर्या शिवकुमार कोरोना पॉझिटिव्ह

Parliament Session|आज पंतप्रधान राज्यसभेत बोलणार