in

अर्जुन पुरस्कार विजेती सारिका काळे अडकणार लग्नबंधनात!

खो-खो मधील अर्जुन पुरस्कार विजेती, शिवछत्रपती पुरस्कार विजेती व भारतीय खो-खो संघाची माजी कर्णधार सारिका काळे दिनांक १३ मे २०२१ रोजी उस्मानाबाद येथे लग्नबंधनात अडकणार आहे.

सारिका काळे उस्मानाबाद मधील एका नामांकित केमिकल कंपनीत मार्केटिंग ऑफिसर असलेल्या आकाश अनिल खोत यांस बरोबर १३ मे रोजी दुपारी १२:२१ वाजता विवाह बंधनात अडकणार आहे. यावेळी कोविड नियमांचं पालन करून हा लग्न सोहळा पार पडणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

कारकीर्द

१९७०-७१ ते १९९८-९९ या कालावधीत खो-खो ला तेरा अर्जुन पुरस्कार मिळाले होते. मात्र त्यानंतर झालेल्या नियमातील बदलामुळे जवळ जवळ वीस वर्ष खो खो मधील खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळाला नव्हता. मात्र त्यानंतर २०२० साली डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या शिष्यने, सारिका काळेने हा पुरस्कार मिळवत स्वतःचं व खो-खो चे नाव सुवर्णाक्षरात कोरले.सध्या सारिका तालुका क्रीडा अधिकारी म्हणून तुळजापूर येथे कार्यरत आहे. तसेच साईच्या पश्चिम विभागीय गुणवान खेळाडू शोध समितीवर तिची निवड झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

केव्हिन पीटरसनचं ‘हिंदी’ ट्वीट व्हायरल; भारतवासियांना केले आवाहन

वसई-विरारला मिळाला 14 हजार कोवीशिल्ड लसीचा साठा