in

चिंताजनक |अजून 2 वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा

Share

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. असे असताना ही जागतिक आरोग्य संघटनेनतील शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी केलेल्या विधानामुळे संपूर्ण जगभराच्या चिंतेत भर पडली आहे. मंगळवारी सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी अजून २ वर्ष वाट पाहावी लागणार आहे. कारण २०२२ च्या आधी कोरोनाची लस मिळणं कठीण आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या कोवॅक्स या उपक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या देशात लस पुरवण्याचं काम केलं जाणार आहे. त्यासाठी पुढच्या वर्षांच्या मध्यापर्यंत करोडो डोज तयार करावे लागतील. म्हणजेच या उपक्रमाशी जोडलेल्या १७० देशांच्या अर्थव्यवस्थांना या उपक्रमातून नक्की काहीतरी मिळवता येईल. जोपर्यंत लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत नाही तोपर्यंत मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगच्या गरजा बदलण्यासाठी कमीत संख्येत डोस उपलब्ध असतील. २०२१ च्या शेवटापर्यंत जवळपास दोन कोटी डोज तयार करण्याचं उद्दीष्ट ठेवलं जाणार आहे.”

”पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात लस येईल आणि माणसं आधीसारखं जीवन जगायला सुरूवात करतील असं अनेकांना वाटत आहे. पण प्रत्यक्षात असं नसून पुढच्या वर्षांच्या मध्यापर्यंत लसीचं उत्पादन करून मुल्यांकन केलं जाईल. २०२१ च्या सुरूवातीला लसीचे परिणाम दिसायला सुरूवात होईल. जगभरातील सुरू असलेल्या लसीच्या चाचण्या पूर्ण होण्यासाठी जवळपास १२ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यावेळी लसीच्या साईड इफेक्ट्सं प्रमाण कमी झालेलं असेल.

भारतात ऑक्सफोर्ड लसीची चाचणी १७ ठिकाणी सुरु असून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाल्यानंतर जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी करार करण्यात आले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील लसची चाचणी अमेरिका, ब्राझील, दक्षिण अमेरिका आणि भारतात सुरू होणार आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

IPL 2020: Whatsapp द्वारे मुंबई इंडियन्सशी कनेक्ट व्हा आणि अपडेट्स मिळवा

आमदार निवासावर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न