in ,

अनिल परब यांचा सोमय्यांविरुद्ध मानहानीचा दावा

राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी भाजप नेते किरिट सोमय्या यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. परब यांनी या दाव्यात शंभर कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली आहे.

अनिल देशमुख प्रकरणात परब यांचाही सहभाग असल्याचा दावा करत सोमय्या यांनी परब यांच्यावर थेट आरोप केले आहेत. याशिवाय परब यांचे दापोलीतील हॉटेल तसेच परिवहन विभागातील बदल्यांच्या प्रकरणावरूनही सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळेच परब यांनी सोमय्या यांना नोटीस पाठवली होती व आरोप मागे घेऊन ७२ तासांत माफी न मागितल्यास तुमच्याविरुद्ध १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेन, असा इशारा दिला होता. या मुदतीत सोमय्या यांनी माफी न मागितल्याने अखेर परब यांनी त्यांच्याविरुद्ध मुंबई हायकोर्टात आज अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

अनिल परब यांनी दावा दाखल केल्यानंतर एक ट्वीट केले असून ‘किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी व मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन ७२ तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते. परंतु त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे’, असे परब यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

साईसंस्थांनचे नुतन विश्वस्त मंडळ अडचणीत ?

बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे तिघं वन विभागाच्या ताब्यात