सचिन वाझे प्रकरणात आरोप झाल्यानंतर अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
पोलीस महासंचालक परमबीरसिंह यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. यामध्ये गृहमंत्र्यांवर झालेले आरोप हे गंभीर असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली असून आरोपांची चौकशी सीबीआय मार्फत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यानंतर अनिल देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेतली. तसेच मुख्यमंत्र्यांकडजे त्यांनी स्वत:चा राजीनामा सूपूर्द केला आहे.
या राजीनामानंतर गृहमंत्री पदाची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राहणार आहे.
Comments
Loading…