in

मुंबईतील धक्कादायक घटना: एकतर्फी प्रेमातून तरुणीला धावत्या लोकलखाली फेकण्याचा प्रयत्न

तरुणीला धावत्या लोकलखाली ढकलण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी खार रेल्वे स्थानकात घडली आहे. लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने २१ वर्षीय तरुणीला धावत्या लोकलसमोर ढकलून दिलं. यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तब्बल १२ टाके पडले आहेत.

खार रेल्वेस्थानकावर ही घटना घडली असून, हा शहारा आणणारा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.सुमेध जाधव (24) असे त्या तरुणाचे नाव असून सुमेधचे पीडित तरुणीशी मैत्रीचे संबंध होते. दोन वर्षांपूर्वी दोघे एका ठिकाणी कामाला होते. तेव्हापासून सुमेध तरुणीवर एकतर्फी प्रेम करू लागला. मात्र सुमेध दारू पित असल्याने तरुणी त्याला टाळत होती. त्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीच्या पालकांनी निर्मलनगर पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी समज दिल्यानंतर तो काही दिवस शांत बसला, मात्र त्यानंतर परत त्याने तरुणीला त्रास देण्यास सुरुवात केली.

शुक्रवारी तरुणी खार स्थानकात येताच सुमेधने लोकलखाली उडी टाकण्याची ऍक्टिंग करत तरुणीलाच धावत्या लोकलखाली फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने ती बचावली. तिच्या डोक्यावर बारा टाके पडले आहेत. तो वडाळा येथील रहिवासी आहे. तर तरुणी खार येथील रहिवासी आहे. शुक्रवारी सायंकाळी सुमेध तिचा पाठलाग करत होता. पाठलाग करतच अंधेरी रेल्वे स्थानकावरून तो लोकलमध्ये चढला. त्यानंतर तरुणीने तिच्या आईला फोन करत मदत मागितली. रेल्वे स्टेशनवर तरुणी आईला भेटली. त्यानंतरही आरोपी तिचा पाठलाग करतच होता. तिथेच त्याने लग्नाचा प्रस्ताव दिला. मात्र, तरुणीने तो फेटाळून लावला. लग्नाला नकार दिल्यानंतर सुमेधनं स्वतःला संपवण्याची धमकी दिली. रेल्व स्थानकात येणाऱ्या गाडीच्या दिशेनं तो धावत सुटला, पण अचानक थांबला आणि पुन्हा परत आला. त्यानंतर तरुणीला जबरदस्तीने पकडलं आणि लोकलच्या दिशेनं घेऊन गेला. रेल्वे स्थानकातून सुटल्यानंतर त्याने तरूणीला प्लॅटफॉर्म आणि धावत्या रेल्वेच्या मध्ये ढकललं.

तरुणीच्या आईने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तरुणीच्या डोक्याला जबर मार बसला. याप्रकरणी वांद्रे रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खलिद व उपायुक्त प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला.पोलिसांनी आरोपीला स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर नाकाबंदी

‘सैफिना’च्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; नावाची सर्वांना उत्सुकता