in

मनपा आयुक्त कार्यालयासमोर जय जवान जय किसान संघटनेचे आंदोलन

Breaking: Tukaram Mundhe replaced
Breaking: Tukaram Mundhe replaced
Share

नागपूर महानगरपालिकेच्या 64 स्वच्छता कर्मचाऱ्यांना कामावर कमी करण्यात आले. तसेच कंपनी बदलून एक ऑगस्टपासून दुसऱ्या कंपनीला काम दिले. त्यामुळे या कामगारांना परत घ्या, या मागणीसाठी आज मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यालयासमोर जय जवान जय किसान या कार्यकर्त्यांनी पीपीई किट घालून आंदोलन केले.
स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्याच्या कालावधीत आपल्या जीवाची बाजी लावत काम केले आणि त्यांना आता कामावरून कमी करण्यात आले. यामुळे या कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे .त्त्वरित त्यांना कामावर घ्यावे मागणी करता जय जवान जय किसान या कार्यकर्त्यांनी पीपीई किट घालून आंदोलन करण्याचे ठरवले. या आंदोलनच्या वेळी मोठमोठ्याने घोषणा देत असताना आणि बॅनर लावले असताना पोलिसांनी ते करण्यास मज्जाव केल्यावर जय जवान आणि जय किसान संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये काही वेळासाठी बाचाबाची झाली. पण त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोपर्यंत उपायुक्त तुकाराम मुंढे भेटत नाही तोपर्यंत बाहेर आंदोलन करण्याचा निर्णय घेत आंदोलन केले .

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

We don't pay attention to what my grandson says - Sharad Pawar

माझ्या नातवाच्या बोलण्याला काडीचीही किंमत नाही – शरद पवार

फक्त 10 वी पासवर मिळणार भारतीय टापाल खात्यात नोकरी…