in

अमोल कोल्हेंनी सोशल मीडियाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी (Amol Kolhe) सोशल मीडिया वापरण्याबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी इन्स्टाग्राम पोस्ट करत म्हटलं आहे की, इन्स्टाग्रामवर नजर टाकताना अनेकदा निदर्शनास आलं की पोस्ट वर प्रतिक्रिया देताना “अभिनेता” की “नेता”अशी अनेकांची गल्लत होते. राजकीय भूमिका प्रत्येकाची वेगळी असू शकते पण ती भूमिका पडद्यावरील, समाजमाध्यमावरील भूमिकेच्या आड येऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळेच एक निर्णय घेतला आहे- इन्स्टाग्रामवर इथे राजकीय पोस्ट करायची नाही.

म्हणजे confusion नको. राजकीय पोस्ट साठी फेसबुक पेज आहेच. चालेल ना? , अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

यासोबतच त्यांनी एक टीप दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, जबाबदार नागरिकाच्या भूमिकेतून मांडलेल्या विचाराला राजकीय भूमिका समजण्यात येऊ नये. सोशल मिडियावर नेटकरी अमोल कोल्हे यांच्या निर्णयाचं कौतुक करत आहेत. वाचा : ‘मराठी इंडस्ट्रीतले मित्र असे कसे?

‘ क्रांतीच्या समर्थनार्थ अभिनेत्याचं Tweet डॉ. अमोल कोल्हे अभिनयासोबत आता राजकारणात देखील उत्तम काम करताना दिसत आहेत. कधी कधी खासदार कधी अभिनय अशी दुहेरी जबाबदारी अमोल कोल्हे पेलताना दिसतात. अमोल कोल्हे यांनी यासंबंधी पोस्ट करत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

स्टोरीटेलवर हजारो मराठी ऑडिओबुक्सचा आनंद फक्त ३९९ रु. मध्ये!

अभिनेत्री वर्षा उसगावकर आता राजकीय आखाड्यात उतरणार