in

नारायण राणेंवर अन्याय होणार नाही, अमित शहांची ग्वाही

लोकशाही न्यूज नेटवर्क

अमित शाह यांच्या हस्ते आज (7 फेब्रुवारी) भाजप खासदार नारायण राणे यांच्या लाइफटाईम या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन केले. या कार्यक्रमामध्ये “जिथे अन्याय होतो तिथे निडरपणे नारायण राणे संघर्ष करतात. जो स्वत:वरील अन्यायविरोधात लढू शकत नाही. ते जनतेविराधात लढू शकत नाही. नारायण राणेंना राजकीय आयुष्यात अनेकवेळा अन्यायाचा सामना करावा लागला. नारायण राणेंना कसे सांभाळायच हे बीजेपीला योग्य पद्धतीने माहित आहे. अन्याय होणार नाही.” याची ग्वाही अमित शाह यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्राने जगाला खुपकाही शिकवले आहे, स्वराज्य धडा दाखवला. या भूमीतून प्रेरणा मिळते. नौदल बनवण्याचे काम महाराष्ट्रात झाले. याच भूमीने संपूर्ण देशाला स्वदेशासाठी आणि स्वातंत्र्यासाठी जीव देण्याचा संस्कार दिला आहे. गरिबांना मदत करण्यात राणे नेहमीच पुढे असतात. राणेंमुळे सिंधुदुर्गचा विकास झाला आहे. मेडिकल कॉलेजचे ग्रंथालय समृद्ध करा या ग्रंथालयामध्ये फक्त मेडिकल पुस्तके न ठेवता त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पुस्तके सुद्धा येथे ठेवा. मोदींच्या नेतृत्वात भारताला विश्वात नाव कमवायचं आहे.असे अमित शाह म्हणाले यावेळी म्हणाले.

त्याच प्रमाणे या कार्यक्रमामध्ये शिवसेनेसह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवर अमित शहांनी घणाघाती टीका केली. बंद दाराआड झालेल्या बैठकीतील वचनावर देखील त्यांनी या सभेत मौन सोडलं. कोणतंही वचन दिलं नसल्याचं ठणकावून सांगितले. तसेच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो होतो. पण, त्यानंतर तीन चाकी रिक्षाचं सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आलं. आणि आता तिन्ही चाकं वेगवेगळ्या दिशेनं चालतात. हे सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरलं आहे. जनतेने जो जनादेश दिला होता, त्याचा अपमान करून सत्तेच्या लालसेपोटी इथे सरकार स्थापन करण्यात आलं. जे म्हणत आहेत की आम्ही वचन तोडलं. त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की आम्ही वचनावर ठाम राहणारी माणसं आहोत. अशा प्रकारचं खोटं आम्ही बोलत नाही. बिहारमध्ये आम्ही निवडणूक लढलो. आम्ही वचन दिलं होतं की एनडीएचं सरकार आलं, डंके की चोट पर करता हूँ. मी कधीही बंद दाराआडील राजकारण केलं नाही. मी जनतेमध्ये राहणारा माणूस आहे. अशा शब्दात अमित शाह यांनी शिवसेनेला उत्तर दिलं.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नारायण राणे म्हणजे दबंग नेते – देवेंद्र फडणवीस

Uttarakhand | तपोवन धरणात अडकलेल्या 16 जणांना बचावण्यात यश