in

अमित शाह सिंधुदुर्गमध्ये दाखल; नारायण राणेंचं शक्तीप्रदर्शन

लोकशाही न्यूज नेटवर्क
नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह कणकवलीत दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस वगळता भाजपचे अन्य नेते हेलिकॉप्टरने थेट कणकवलीमध्ये दाखल झाले आहेत.

अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणेंच्या मेडिकल कॉलेजमध्ये स्पेशल लिफ्ट तयार करण्यात आली आहे. 18 लाख रुपये खर्चून ही लिफ्ट तयार करण्यात आली आहे. नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वीच या खास लिफ्टची पाहणी केली होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नारायण राणे कोकणात शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे राणेंच्या या शक्तीप्रदर्शनासह शहा यांच्या भाषणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.

आज दुपारी 2 वाजता अमित शहा यांच्या हस्ते नारायण राणे यांच्या लाईफटाइम मेडिकल कॉलेजचा उद्घाटन सोहळा पार पडेल. आज दुपारी बरोबर 1.50 वाजता शहा हे गोवा येथे पोहोचले. तिथून हेलिकॉप्टरने ते पडवे-कसाल येथील लाईफ टाईम मेडिकल कॉलेज परिसरात आले असून काही वेळातच या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या सोहळ्या निमित्ताने शहा तब्बल दोन तास सिंधुदुर्गात थांबणार आहेत. कार्यक्रमानंतर ते राणे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करतील.

या कार्यक्रमाला अमित शहा यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे आणि जिल्ह्यातील आमदार आणि खासदार उपस्थित आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘समाजवादी विचारांनी आपल्यावर अन्याय केला’

पंतप्रधान मोदी आसाम, पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर…निवडणुकांमुळे मोठ्या घोषणांची शक्यता