in

“मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…ही वाक्य कानावर पडेल तो सुवर्ण दिवस असेल”

राज्यात आज दिवसभर प्रताप सरनाईक यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची चर्चा असतानाच मनसेचे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी ट्विट केलंय. यामध्ये राज ठाकरे यांचा जुना फोटो शेअर करत त्यांनी ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचं रंगवलंय.

महाविकास आघाडी सरकारवर शेलक्या शब्दांत हल्ला चढवणारे मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आज एक खास ट्विट केलं आहे. “माझ्या महाराष्ट्रात राजकारण्यांचे सत्तेसाठी सुरू असलेले किळसवाणे ‘प्रताप’ बघितले की पुन्हा एकदा खात्री पटते…”मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…” हे वाक्य कानावर पडेल, तो दिवस महाराष्ट्राच्या भवितव्यातील सर्वात सुवर्ण दिवस असेल”, असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यास तो दिवस महाराष्ट्राच्या भवितव्यातील सर्वात सुवर्ण दिवस असेल, असं अमेय खोपकर यांनी ट्विटमध्ये म्हटलंयं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“दिल्लीतील दोन्ही दाढीवाल्यांचं शटर बंद करायचंय”, पटोलेंच्या निशाण्यावर ‘मोदी-शाह’

राज्यातील रुग्णसंख्येत घट, रिकव्हरी रेट वाढला