in

Zombivali Poster: ‘झोंबिवली’ सिनेमातून मराठीत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर अवतरणार झॉम्बी

Share

लॉकडाऊनमुळे थांबलेल्या मनोरंजन विश्वाला थोडा दिलासा देत राज्य सरकारने शूटिंगला ग्रीन सिग्नल दिला. असं असलं तरीही अर्थात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या नियमांच्या चौकटीत राहूनच शूटिंगला परवानवगी मिळाली आहे. या सगळ्या खबरदारी घेत नुकतीच एका मराठी सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात करण्यात आली आहे. हा सिनेमा म्हणजे ‘झोंबिवली’. या सिनेमाचे पहिले-वहिले पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

प्रेक्षकांचे आगळ्या-वेगळ्या पध्दतीने मनोरंजन करण्यासाठी मराठीतला पहिला झॉम-कॉम सिनेमा ‘झोंबिवली’ लवकरच भेटीला येण्यासाठी सज्ज झालाआहे. नुकतच या सिनेमाचं शूट सुरू करण्यात आलं असून पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अॅक्शन, सीन्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना कथेशी खिळवून ठेवणारे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार हे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. आदित्य यांनी क्लासमेट्स, माऊली, फास्टर फेणे आदी मराठी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. सारेगम प्रस्तुत आणि Yoodlee Films निर्मित ‘झोंबिवली’ या सिनेमाचा मुहूर्त नुकताच मुंबई येथे पार पडला आणि या सिनेमातील काही सीन्सचे शूटिंग लवकरच लातूर येथे होणार आहे.

ब-याच कालावधीनंतर मराठी सिनेमात हॉरर-कॉमेडी पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत आपण बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये झोंबिवर आधारित सिनेमे पाहिले आहेत. पण मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच झोंबिवर आधारित सिनेमा बनतोय. या सिनेमाचे शिर्षक इंटरेस्टिंग आहेत आणि डोंबिवलीमधील झोंबिज असे कनेक्शन असल्यामुळे सिनेमाचे नाव ‘झोंबिवली’ असे आहे. युथ स्टार्स अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. निर्मात्यांच्या मते ‘झोंबिवली’ हा सिनेमा तरुण पिढीला लक्षात ठेवून बनवला आहे. त्याच बरोबर हॉरर आणि कॉमेडी या दोन्ही गोष्टींचं उत्तम समीकरण प्रेक्षकांना या सिनेमात अनुभवायला मिळणार आहे. सिनेमाचा नविन विषय, कलाकारांच्या नवीन जोड्या या सगळ्या गोष्टींमुळे सिनेमाप्रती प्रेक्षकांची उत्सुकता ताणली जाणार हे नक्की. डोंबिवलीमध्ये घडणारी ही ‘झोंबिवली’ची कथा काय आहे याचे उत्तर पुढच्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये प्रेक्षकांना मिळेल.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

‘मजूर’ आई-वडिलांच्या कष्टाचे ‘मोल’;विद्यार्थिनीने पटकावले 94.40 टक्के

ONGC मध्ये मेगा भरती