in

Watch Video; ‘मी काय कुंद्रा आहे का?; राज ठाकरेंचा मिश्किल टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या आगामी महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत आहे. आज पुण्याच्या दौऱ्यावर असताना ते पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मी काय कुंद्रा आहे का ? असा प्रश्न विचारला. त्यांच्या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यांच्या वक्तव्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.

राज ठाकरे पुण्यातील कार्यालयात दाखल झाल्यानंतर सर्व पत्रकार, कॅमेरामन, फोटोग्राफर्सने त्यांचे फोटोज, व्हिडीओ घेण्यासाठी गर्दी केली होती. बराचवेळ फोटोग्राफर फोटोज काढत होते हे पाहून राज ठाकरेंनी हसत हसत एक मिश्किल टोला लगावला आहे. राज ठाकरेंनी हसत हसत फोटाग्राफर्सकडे पाहिले आणि म्हणाले, काल पण माझेच फोटो आणि आज पण..किती वेळा तेच तेच. मी काय कुंद्रा आहे का? असा मिश्किल टोला त्यांनी हाणला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तेजपाल वाघ घेऊन येतोय नवीन मालिका…

जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात; मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडली