in

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या व्हॅनिटी व्हॅनचा अपघात

लोकशाही न्यूज नेटवर्क
दाक्षिणात्य चित्रपटांतून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अल्लू अर्जूनच्या व्हॅनिटी व्हॅनला अपघात झाला आहे . शनिवारी हैदराबादेत अल्लूच्या व्हॅनिटी व्हॅन फाल्कनला अपघात झाला.

अल्लू अर्जुनची मेकअप टीम रामपचोदवरम येथून परत येत असताना हा अपघात झाला. व्हॅनिटी व्हॅनच्या ड्रायव्हरने ब्रेक मारताच मागून येणा-या लॉरीने व्हॅनला जोरदार धडक दिली. सुदैवाने यावेळी अल्लू अर्जुन व्हॅनिटीमध्ये नव्हता. त्याची मेकअप टीम मात्र व्हॅनिटीमध्ये होती. या टीममधील सर्वजण सुरक्षित आहेत.

दरम्यान, ही व्हॅन त्याने २०१९ साली खरेदी केली होती. त्यावेळी त्याने सोशल मीडियावर त्याचे फोटोही शेअर केले होते. त्याने 7 कोटी रुपयांत ही व्हॅनिटी खरेदी केली होती. फाल्कन असे त्याच्या व्हॅनिटीचे नाव आहे. अनेक लक्झरी फिचर्स असणाऱ्या या कारचे एक्सटीरीअर पाहिले तर त्यावर अल्लूने ‘AA’ असं स्वत: चं नाव कोरून घेतलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कृषी कायदे रद्द करा; राहुल गांधींचा पुनरुच्चार

‘समाजवादी विचारांनी आपल्यावर अन्याय केला’