in ,

मनसुख हिरेन यांची आत्महत्या नव्हे हत्याच, निकटवर्तीयांचा थेट आरोप

अँटिलिया स्फोटक प्रकरणात मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुब्र्याच्या खाडीत सापडला. ही आत्महत्या असल्याचे ठाणे पोलिसांनी जाहीर केले. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मनसुख यांच्या कुटुंबीयांसह निकटवर्तीयांनी केला आहे. तसेच या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशी मागणी करत, हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिला आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ गेल्या आठवड्यात संशयास्पद स्कॉर्पिओ कार मिळली होती. तिचा तपास केल्यावर त्यात जिलेटीनच्या कांड्या आढळल्या होत्या. एका टेलिग्राम मेसेजच्या माध्यमातून जैश-उल हिंदने ही स्फोटके आपण ठेवल्याचा दावा केला होता. नंतर ही गाडी ठाण्यातील मनसुख हिरेन यांची असल्याचे स्पष्ट झाले. पण काल (5 मार्च) हिरेन यांचा मृतदेह सापडला.

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मनसुख हिरेन यांचे शवविच्छेदन करण्यात आले. हिरेन यांचा बुडून मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटल्याचे सांगण्यात येते. यावरून मनसुख हिरेन यांचे कुटुंबीय आणि निकटवर्ती आक्रमक झाले आहेत. तपास पूर्ण व्हायच्या आधीच ही आत्महत्या आहे, असा दावा कशाच्या आधारे केला? हिरेन यांची हत्याच झाली आहे. त्यामुळे त्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या तोंडात रुमाल कोंबले होते. आत्महत्या करताना घरातून एवढे रुमाल कोण घेऊन जाईल का, असा सवाल त्यांनी केला.

या घटनेत अनेक योगायोग -फडणवीस
अॅन्टिलिया स्फोटक प्रकरणात अनेक योगायोग पाहायला मिळतात. एवढे योगायोग हिंदी चित्रपटातही नसतात. सर्व घटना ठाण्याशी निगडीत आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अ‍ॅन्टिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्कॉर्पिओ गाडी ठाण्याची आहे. तिच्याबरोबर आणखी एक गाडी आली, तीही ठाण्याचीच होती. स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन हे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या संपर्कात होते, तेही ठाण्याचे आणि हिरेन यांचा मृतदेह सापडला तो मुंब्रा खाडीत, ती देखील ठाण्यातच आहे, असे फडणवीस म्हणाले. हे सर्व पाहता या प्रकरणात नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे. कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. तो कोण आहे, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल केला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

India vs England 4th Test: भारताने 3-1 ने कसोटी मालिका जिंकली

‘आता केवळ नोटांवर मोदींचा फोटो यायचा बाकी आहे’