in

३१ जानेवारीपर्यंत देशातील सर्व अंगणवाडी सेवा सुरू होणार

Share

लोकशाही न्यूज नेटवर्क

सर्वोच्च न्यायालयाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांना कंटमेंट झोन वगळता देशभरात अंगणवाडी सेवा पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशातील अनेक राज्यातील अंगणवाडी केंद्रे बंद होती. कोरोनामुळे १४ लाख अंगणवाड्या बंद करण्याचा मुद्दा याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला होता. या याचिकेत मुलांना व मातांना पौष्टिक आहार न मिळण्याने त्रास होत असल्याचं म्हटलं होतं. अंगणवाडी केंद्रांमार्फत शून्य ते सहा वर्षे व गर्भवती महिलांना पौष्टिक आहारा पुरवला जातो. केंद्र सरकारने लहान मुलांसाठी आणि गरोदर मातांच्या निरोगी आरोग्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपविली आहे. त्यानुसार, अंगणवाडीत गावातील सर्व गर्भवतींना विशेष आहार, लसीकरण केलं जातं. तसेच सरकारकडून पहिल्या बाळंतपणात मातांना पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

भारत-पाकिस्तान सीमेवर आढळला १५० मीटर लांब भुयारी मार्ग

…तरच राज्यात उद्योग येतात, टेस्लावरून भाजपाचा शिवसेनेला टोला