in

ठाण्यातला धक्कादायक प्रकार; जिवंत शिक्षकाला केलं मृत घोषित

ठाणे महानगरपालिकेच्या निष्काळजीपणाचा प्रकार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. चक्क 55 वर्षीय व्यक्तीला जिवंतपणी मृत घोषित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबधित व्यक्तीने त्वरित महापालिकेत धाव घेत आरोग्य विभागाकडे तक्रार केली.

ठाण्यातील मानपाडा येथे राहणाऱ्या चंद्रशेखर देसाई यांना ऑगस्ट 2020 रोजी कोरोनाची लागण झाली होती. दरम्यानच्या काळात होम क्वॉरन्टाईन राहून घरीच उपचार करुन देसाई बरे झाले होते. दरम्यान अचानक देसाई यांना मंगळवारी पालिकेच्या आरोग्य विभागातून एका महिलेचा फोन आला. यावेळी महिलेने चंद्रशेखर देसाई हे कधी मृत झाले ? आम्हाला नोंद करायची आहे ? तसेच मृत्यूचे प्रमाणपत्र तयार आहे, प्रश्न विचारले. या महिलेचे हे वाक्य ऐकून देसाई यांच्या पायाखालची वाळू सरकली.

मी जिवंत असल्याची त्यांनी या महिलेला सांगितले. दरम्यान चंद्रशेखर देसाई यांनी त्वरित महापालिकेत धाव घेत आरोग्य विभागाकडे तक्रार केली. तसेच ठाणे महापालिकेने निदान नोंदणी व्यवस्थित करावी अशी मागणी देसाई यांनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी, त्यांना कोण मोठं मानणार?

सोनू सूदची महिला नेमबाजाला मदत; आता सुवर्ण कामगिरीकडे लक्ष्य