राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असतानाचं बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर अभिनेत्री आलिया भट्टनंही स्वतःला विलगीकरणात ठेवलं होतं. अशात आता आलियाच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. गंगूबाई काठियावाडी चित्रपटाच्या सेटवर संजय लिला भन्साळी यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी केली जात आहे. यात आलिया भट्टचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय लीला भन्साळी कोरोना पॉझिटिव्ह आले असून ते सध्या क्वारंटाईन आहेत. संजय आणि रणबीर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येताच आलियानंही स्वतःला क्वारंटाईन केलं होतं. यानंतर संजय यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी केली गेली.
Comments
Loading…