in

राज्यात दारू महागणार… उत्पादन शुल्कात वाढ

आज राज्याचा अर्थसंकल्प महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत सादर केला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आहे. यावेळी आरोग्य सेवेसाठी 7 हजार 200 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच ५ हजार कोटी आरोग्य विभागासाठी तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य विभागास यंदा २९०० कोटी रुपये सरकारकडून मंजूर करण्यात आले आहेत. तर वैद्यकीय शिक्षण विभागास १५१७ कोटी देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

या अर्थसंकल्पात राज्य उत्पादन शुल्क दरात वृद्धी करण्यात आली असून, देशी मद्याचे ब्रॅण्डेड व नॉन ब्रॅण्डेड असे दोन प्रकार निश्चित करून त्यापैकी देशी मद्यावरील उत्पादन शल्काचा दर निर्मिती मूल्याच्या २२० टक्के किंवा १८७ रुपये प्रति लीटर करण्यात येणार असल्याची घोषणा देखील अजित पवार यांनी केली. मद्यावरील मूल्यवर्धित करामध्येही वाढ करण्यात आली असून, ६० टक्क्यावरून ६५ टक्के करण्याचा प्रस्ताव. १ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळणार. मात्र, यासर्व कारणामुळे राज्यात दारू महागणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तीन लाखापर्यत शून्य टक्के व्याजाची फसवी योजना – देवेंद्र फडणवीस

पाहा अर्थसंकल्पात कोणत्या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मिळणार निधी…