in

Akshay Kumar: फेक बातमीवर अक्षय कुमार चिडला, म्हणाला- मी माझ्या बहिणीसाठी चार्टर्ड फ्लाईट…

Share

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा कायम मदतीसाठी पुढे येताना दिसतो. मग ते अती पावसामुळे उद्धभवलेल्या पुरांमध्ये अडकलेल्या बाधीतांसाठी असो किंवा अगदी नुकताच असलेल्या कोरोना संकटासाठी असो. स्वत: च्या कुटुंबासह इतरांच्या कुटुबांसाठी देखील पाठीशी राहण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. या अभिनेत्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कित्येक कोटींची मदत दिली आहे तसंच पोलिसांसाठी तो मदत देताना दिसला आहे. आता तो त्याच्या सख्या बहिणीसाठी सुद्धा काहीतरी खास करत आहे ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली.

अक्षय कुमारने आपली बहिण अल्का भाटिया आणि तिच्या दोन मुलांसाठी एक चार्टर फ्लाईट म्हणजेच एक पूर्ण फ्लाईट बूक केल्याच्या बातम्यांनी जोर धरला होता. देशात नुकतीच हवाई सेवा सुरु झाली आणि अक्षयच्या बहिण ज्या मुंबईत आहेत त्यांना दिल्लीला त्यांच्या घरी पाठवण्यासाठी पूर्ण फ्लाईट बूक केली आहे असं बोललं जात होतं. एका इंग्रजी ऑनलाईन पोर्टलने ही बातमी सुद्धा प्रसिद्ध सुद्धा केली. त्यानंतर भाऊ असावा तर असा वगैरे म्हणत अक्षयवर कातुकाचा वर्षाव केला आहे.

आता मात्र अक्षयने यावर मौन सोडलं आहे आणि तो भलताच भडकला आहे. त्याने एक पोस्ट टाकत यावर स्पष्टीकरण दिलंय, शिवाय या खोट्या बातम्यांवर कारवाई करणार असल्याचं देखील म्हंटलं आहे.

अक्षयने नुकतंच ट्विट करत लिहिलं, ‘मी माझ्या बहिणीसाठी आणि तिच्या दोन मुलांसाठी एक चार्टर फ्लाईट बुक करण्याची बातमी साफ खोटी आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून तिने कुठेही प्रवास केलेला नाही आणि तिला एकच मुल आहे! अशा बनावट आणि खोट्या बातम्या आता बस्स! यावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करतो आहे.’ अक्षय ने या पोस्टमध्ये या चुकीच्या बातमीची लिंक सुद्धा टाकली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

आता लाड़के आदेश भावोजी घरच्या घरी वहिनींना भेटणार, झी मराठीवर लवकरच ‘होम मिनिस्टर घरच्या घरी’

कोरोनाचे संकटातच एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढल्या