लोकशाही न्यूज नेटवर्क
पंजाबमध्ये पालिका निवडणुकांचा प्रचार सुरू झाला आहे. याच निवडणूकूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणदेखील तापत आहे. पंजाबमधील मोगा येथे सुरु असलेल्या प्रचारावेळी अकाली दल आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे. यावेळी हाणामारीत अकाली दलाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. तर एक अन्य कार्यकर्ते गंभीर जखमी झाला आहे.
जखमींवर प्राथमिक उपचारांनंतर लुधियाना येथे अधिक उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. अकाली दलाचे कार्यकर्ते प्रचार करत होते. तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अकाली दलाच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर वाहन चढवल्याचा आरोप होत आहे. या घटनेत अकाली दलाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. तर अन्य एक कार्यकर्ता जखमी झाला.या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या १४ फेब्रुवारीला पालिकेच्या निवडणुका होणार आहे.
Comments
Loading…