in

राष्ट्रवादीत प्रवेशाआधी भाजप नेते कल्याणरावांच्या घरी, अरे तुम्हाला कुठे घालायची घाला ना

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रचारसभेनंतर तर वातावरण चांगलेच तापले आहे. कारण अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये भाषण करत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालकेच विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. या निवडणूकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादीत थेट लढत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणता पक्ष विजयी होतो, याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांच्या उपस्थितीत पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची प्रचारसभा झाली. या प्रचारसभेत “कल्याणराव काळे राष्ट्रवादीत जाणार म्हटल्यावर अनेकांच्या पोटात दुखलं. दोन तीन दिवस भाजपचे नेते कल्याणराव काळेंच्या घरी जाऊन बसले. अरे तुम्हाला कुठे घालायची घाला ना”अशा अजित पवार स्टाईलमध्ये त्यांनी भाषण केलं.तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. या प्रचारसभेतच भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

ट्रॅक चुकला होता- कल्याणराव काळे

दरम्यान दोन वर्षांतच कल्याणराव काळे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावरुन “मधल्या काळात आपला ट्रॅक चुकला होता” अशी टोलेबाजीही कल्याणरावांनी केली. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सहकार शिरोमणी वसंतराव कारखान्याचे अध्यक्ष असलेले कल्याणराव काळे यांचा पूर्ण गट राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा प्रचार करणार आ

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वर्धात पैशाचा पाऊस पाडणारा मांत्रिक पसार, दोन आरोपींना अटक

WhatsApp ने यूजर्ससाठी लॉन्च केले खास फीचर्स