in ,

Ajit Pawar | ‘यांच्या’ निर्देशानंतर एसटी महामंडळाला ५०० कोटी वितरीत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देश व कार्यवाहीने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

चालू आर्थिक वर्षासाठी १४५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी ८३८ कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरीत केला आहे. उर्वरीत ६१२ कोटींपैकी ५०० कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत असे निर्देश पवार यांनी दिले. त्यानंतर तातडीने हा निधी वितरीत करण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार निधी वितरीत झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असून महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

त्यानुसार येणाऱ्या काळात कार्यवाही करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५०० कोटी रुपये वितरीत करण्याचे निर्देश दिले व त्यानुसर तातडीने निधी वितरीत करण्यात आला. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Sidharth Shukla| सुशांत सिंह राजपूत आणि सिद्धार्थच्या मृत्यूमध्ये ‘हे’ आहे साम्य

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी शिवसंग्रामचे जिल्हाधिकारी कचेरी बाहेर आंदोलन