in

farmers protest : ट्विट करणाऱ्या सेलिब्रिटींचा अजित पवारांनी घेतला खरपूस समाचार

लोकशाही न्यूज नेटवर्क

शेतकरी आंदोलनानं दिवसेंदिवस उग्र होत असून, आंतरराष्ट्रीय पातळीवरही या आंदोलनाबद्दल बोलले जात आहे. या प्रकरणाबद्दल भारतातील कला आणि क्रीडा क्षेत्रासह अनेक नामवंतांनी ट्विट करून भूमिका मांडली होती. ट्विट करणाऱ्या सेलिब्रिंटींना “त्यावेळी तुम्हाला कुणी थांबवलं होतं का?” असा सवाल करत अजित पवारांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

“सेलिब्रेटींना माझी विनंती आहे, दोन-तीन महिने झालेत शेतकरी तिथे बसलेले आहेत. त्यावेळी का नाही काही मत व्यक्त केलं. कुणी थांबवलेलं होतं. आता बाहेरच्या कुठल्या सेलिब्रेटीला वाटलं की, इथं भारतातल्या शेतकऱ्यांबद्दल लक्ष दिलं गेलं पाहिजे. ते त्यांचं मत आहे. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. ते मत व्यक्त केल्यावर इथं कुणाकुणाला जाग यायला लागली. इथं कुणी थांबवलं होतं का? आज शेतकरी तिथे थंडी वाऱ्यात बसलेला आहे, हे दिसलं नाही. असे म्हणत अजित पवारांनी सेलिब्रेटींचा खरपूस समाचार घेतला

यावेळी अजित पवारांनी केंद्र सरकारवर देखील सडकून टीका केली, “देशाच्या इतिहासामध्ये शेतकरी अहिंसेच्या माध्यमातून आंदोलन करू पाहत आहेत तुम्ही मात्र अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून, उलट खिळे मारताहेत ही काय पद्धत झाली का? बॅरिकेट्स लावता. सुरक्षा लावता, हेही आम्ही समजू शकतो. पण, तीन चार महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. बारा तेरा बैठका होऊन चर्चा निष्पळ होते. चर्चा करून विषय संपवायला काय होतं? याचा अर्थ पुढे मागे सरकण्याची ची केंद्र सरकारची मानसिकताच नाही. घेतलेला निर्णय , असा अट्टाहास आहे. हा निर्णय शेतकऱ्यांना पटत नसेल, तर लाखांचा पोशिंदा मागणी करेलच,” असं ते पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मोठी बातमी : मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलली

सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी दोन वैद्यकीय अधिकारी निलंबित