in

‘भाजपामधून राष्ट्रवादीमध्ये येण्यास अनेक नगरसेवक उत्सुक’

महापालिका निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असणार्‍यांसाठी पक्षाची दारे उघडी आहेत. भाजपातील अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक आहेत. काही कारणांमुळे जे पक्ष सोडून गेले. ते परत येत असतील व ते आपल्याकडील कार्यकर्त्यांपेक्षा जास्त ताकदीचे असतील तर त्यांना सामावून घेतले जाणार आहे, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पिंपरी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना दिले.

आमच्याकडे कार्यकर्ते आहेत. त्यांच्यापेक्षा ताकदीचा नगरसेवक येणार असेल तर त्यांचे स्वागतच आहे. कोणत्याही निवडणुकीत मॅजीक फिगर महत्वाची असते. राज्यात २८८ पैकी ज्यांच्याकडे १४५ आमदार आहेत. तेच राज्यात सरकार स्थापन करू शकतात. तसेच महानगरपालिकेत पण आहे. पक्षाचे आता आहेत त्यापेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले पाहिजेत. सर्वांना माहिती आहे की, भाजपातील आताचे कितीतरी नगरसेवक असे आहेत की ज्यांना पाठीमागच्या कालखंडात मी त्यांना संधी दिली. त्यांना वेगवेगळी पदे दिली. असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

धक्कादायक : मुंबईत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या

Corona Update : देशात ३५ हजारांच्या वर नवे रुग्ण